Tuesday, 6 January 2015

श्रीगणेशा ब्लॉग वापराचा!

       मित्रांनो, आज माझा हा ब्लॉगच्या विश्वातला पहिलाच दिवस! नव्याची नवलाई प्रत्येकालाच असते, नाही का? आमचे मित्र सोमनाथ गायकवाड सर यांनी whatsappच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनामुळे मी हा प्रयत्न केला. तो यशस्वी देखील झाला! पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या यशाची खुमारी काही औरच असते नाही का!
      या ब्लॉगवर आपण विविध विषयांवर गप्पा मारणार आहोत, नवीन ज्ञानाच्या तिजो-या उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संगणक युगातील सर्वच गोष्टी कशा अविश्वसनीय वाटतात! मात्र अशा गप्पांमधून त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवत असताना मोठा आनंद होत आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, अन् आपण ती पूर्ण करालच ही खात्री आहे.
मित्रांनो, आज माझा हा ब्लॉग